Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

वसमत शहरात चैन स्नॅ्चिंग ची घटना : दुचाकीवरून महिलेचे गंठण हिसकावून पसार

 



वसमत / खदीर अहेमद

वसमत शहरातील विष्णू नगर भागात एका काळ्या पल्सरवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढल्याची घटना घडली असून याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

परभणी जिल्हयातील पोखर्णी येथील साधना वाघ ह्या वसमत येथे त्यांच्या नातेवाईकांकडे विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. शनिवारी दुपारी त्या त्यांच्या नातेवाईक महिलेला सोबत बाजारात खरेदी करून त्या परत घराकडे निघाल्या होत्या.

 शहरातील विष्णूनगर भागात एका काळ्या रंगाच्या पल्सरवर दोघे जण त्यांचा पाठलाग करीत आले. त्यापैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने तोंडाला रुमाल गुंडाळलेला होता. त्यांनी सुरवातीला त्यांच्या समोरून दुचाकी नेली. 

या मार्गावर कोणीही येत नसल्याचा अंदाज घेत त्यांनी पुन्हा मागे येऊन साधना यांच्या गळ्यातील सोन्याची गंठण हिसकावले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्या घाबरून गेल्या. त्यांनी मदतीसाठी आरडा ओरड केली मात्र तो पर्यंत दुचाकी वरील चोरटे पसार झाले होते.


या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक संतोष शेकडे, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार भोपे, प्रशांत मुंढे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली असून त्या दोन चोरटे आढळून आले आहे. दोन्ही चोरटे बाहेरगावातील असावे अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments