वसमत / खदीर अहेमद
17 सप्टेंबर 2024 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून निबंध मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा केलेला विकास तसेच आगामी कालखंडात भारतातील पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर अर्थकारण संरक्षण सामाजिक न्याय क्रीडा कृषी आत्मनिर्भर भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर तसेच युवकांच्या असलेल्या अपेक्षा व सूचना निबंधामार्फत कळवाव्यात अशी माहिती भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी महाराष्ट्र राज्य चे प्रदेश सहसंयोजक मिलिंद राजकुमार यंबल शिरड शहापूरकर यांनी वसमत येथे पत्रकार परिषद घेऊन कळविल्या आहेत या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रुपये 21000 रोख आणि पदक द्वितीय पारितोषिक 15000 रुपये रोख व पदक तृतीय पारितोषिक 11000 रुपये रोख व पदक व उत्तेजनार्थ पाच पारितोषिके प्रत्येकी एक हजार रुपये रोख व पदक अशा स्वरूपाचा असणार असल्याची माहिती मिलिंद यंबल यांनी दिली आहे वसमत विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी व युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे अवाहन त्यांनी केले.
निबंध स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक 5 सप्टेंबर 2024 आहे वयोगट 15 वर्ष ते पंचवीस वर्ष शब्द मारे मर्यादा किमान 500 शब्द निबंध मातृभाषा मराठीत असावा निबंध रजिस्टर A4 रेषा असलेल्या पानावर लिहिलेला असावा पानाच्या एका बाजूला निबंध लिहावा स्पर्धकाचा पत्ता व मोबाईल नंबर निबंधाच्या खाली लिहावा वयाचा पत्त्याचा व नावाचा पुरावा म्हणून आधार कार्डची दोन्ही बाजूची झेरॉक्स लावावी आणि निबंध मिलिंद यंबल संपर्क कार्यालय श्रीनगर भुरीप गाव रोड या पत्त्यावर स्पर्धकाने पोहोचवावा.
तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली.
0 Comments