गिरगावात महाआरोग्य अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
वसमत / खदीर अहेमद
रूग्णांची सेवा करण्याचे भाग्य सर्वांनाच मिळत नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांना रुग्ण सेवेची संधी मिळाली आहे. असे वक्तव्य गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी येथे केले.
"योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी" या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यविषयक संकल्पनेतून, ग्रामीण भागातील सर्व वयोवृद्धांना आता सर्व आजारावर मोफत आरोग्यसेवा देण्यात येत असल्याने, वयोवृद्धासह सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगण्यास मदत मिळत आहे. बुधवार (दि.७) हिंगोली लोकसभा क्षेत्रातील गिरगाव सर्कल येथे संपन्न झालेल्या या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे जनसंपर्क अधिकारी दादासाहेब थेटे, शिवसेना तालुकाप्रमुख राजू चापके, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे मारोती कल्याणकर, वसमत तहसीलदार श्रीमती शारदा दळवी, गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे,
राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून व खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून गाव तिथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरातून अनेक गरजवंत लाभार्थ्यांना औषधोपचारा सोबतच आरोग्य उपचार मिळत असल्याने असाह्य जीवन जगणाऱ्या निराधार, ज्येष्ठ आणि दिव्यांग बांधवांना चांगला आधार मिळत आहे.
सिकलसेल, एचआयव्ही, सीबीसी, एचबीसी, बीएसएल, एलएफटी, केएफटी, आरबीएस, थुंकी, त्वचा, डोळ्याचे आजार, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, एनसीडी, पीएमजेए व इतर आजाराची या शिबिरात तपासणी करण्यात आली. या सर्व रुग्णांना औषधोपचार व योग्य मार्गदर्शन डॉक्टरांच्या पथकाने केले. दृष्टी दोष असणाऱ्या गरजवंत रुग्णांवर लवकरच लायन्स क्लब नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण ५८३ रुग्णांनी व नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
यासाठी मच्छिंद्र सोळंके, भद्रीनाथ कदम, पांडुरंग नादरे, रवी पाटील नादरे, देविदास पाटील कऱ्हाळे, भाई पाटील कऱ्हाळे, विलासराव नादरे, कल्याण कऱ्हाळे, प्रमोद नादरे, व्यंकटेश कऱ्हाळे, विनायक, कऱ्हाळे,गणेश नादरे, विष्णू कऱ्हाळे, पंचायत समिती विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह अनेकांनी या शिबिरास सहकार्य केले. या पुढे होणाऱ्या सर्व महा आरोग्य शिबिराचा गरजूंनी लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी असे खासदार हेमंत पाटील यांनी आवाहन केले आहे.
0 Comments