वसमत / खदीर अहेमद
वसमत तालुक्यातील पार्डी (बुद्रुक) येथील ४०:३९ हे .आर. क्षेत्र नवीन औद्योगिक क्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
नवीन एमआयडीसी क्षेत्र स्थापन करण्यातील मार्ग मोकळा
कलम २ खंड( ग) अन्वे सरकारी क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास हस्तांतरीत करण्यात आले आहे.
वसमत विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर प्रत्येक तरुणाच्या हाताला काम व त्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. याच उद्देशाने वसमत येथे नवीन एम.आय.डी.सी. निर्माण करून विशेष सवलती देण्यात याव्यात हि मागणी आमदार राजुभैया नवघरे यांनी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याची कॅबिनेट संभाजीनगर येथे संपन्न झाली होती त्या कॅबिनेटमध्ये आमदार राजुभैया नवघरे यांनी ही मागणी केली होती.
तालुक्यात आज भरपूर युवक उच्चशिक्षित सुशिक्षित आहेत परंतू वाढीव बेरोजगारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मतदारसंघातील तरुणांना रोजगारासाठी तसेच नोकऱ्यांसाठी पुणे ,मुंबई ,संभाजीनगर येथे जावे लागते .हाताला काम नसल्यामुळे ते परगावी जात होते आता ही बेरोजगार तरुण आ.रजुभैय्या नवघरे यांच्या मुळे स्थानिक जागी राहून त्यांना रोजगार मिळणार आहे.
0 Comments