वसमतमध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन
वसमत / खदीर अहेमद
वसमत शहरात आज रोजी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करताना निवेदन देण्यात आले की कोल्हापूर येथील विशाळगड पासून सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असणारे गाजापूर म्हणून गाव आहे. तिथे कोणतही अतिक्रमण जातीय तेढ अथवा एकमेकांच्या धार्मीक स्थळावर कोणतेही अतिक्रमण नसतांना विशाळगळ येथे झालेल्या एका सभेचे पडसाद म्हणुन विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या नावखाली गाजापूर गावातील अल्पसंख्यांक समाजाच्या घरांवर अचानक हजारोंच्या संख्येत जमाव येतो. अग्दी सुनियोजीत व हेतु पुरसपरपणे सदरचा जमाव एका विशिष्ट समजाच्याच घरांना लक्ष करून हिंसाचार करणारे दहशतवादी लोक त्यांच्या घरांची लुटालुट करून घराचे तोडफोड केली तसेच ज्यात निष्पाप महिला लहान मुले सामील होते.त्यांना मारहान करून त्यांच्या घरांनाची जाळपोळ केली. अग्दी बंद घर सुध्दा दंगलीच्या भक्षकाद्वारे पाडली गली. स्थानीक समाजाच्या दुचाकी चारचाकी वाहनांचे तोडफोड करून प्रचंड आर्थिक नुकसान केले गेले.
पोटाची खळगी भरण्यासाठी चालवत असलेल्या चाहाच्या टप-या व छोटी मोठी दुकाणे उध्दस्य केली गेली.
इतकेच नाही तर शेकडों दंगलखोरांनी आपला मोर्चा स्थानिक धार्मिकस्थळ कडे वळवत नारे देत विनाकारण शिरूण मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. धार्मिक स्थळांवर चडून हातोडयाणे घाव घालत तोडण्यात आले आणि खिडक्या तोडले आहेत. असे निवेदन आज उप विभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाड यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना देण्यात आले आहे.
त्यावेळी महाऊर्जाचे सय्यद इम्रान आली,एम आय एम शहर अध्यक्ष इरफान पठाण तालुका अध्यक्ष शेख मुदस्सर,मिर्झा फय्याज बेग, अमजद सिद्दिकी, हारून दालवाले,अब्दुल सत्तार,मोबिन दा,सय्यद ताजू आली, अस्लम बाबा, शीबली मौलाना,कासिम पॉप्युलर, इस्तेखार शेख,इल्यास हट्टेकर व असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.
0 Comments