Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

ई -शिधापत्रिका द्या अन् मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी करा

 


हिंगोली, दि. १६ (जिमाका): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य‌ शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी शिधापत्रिकेची आवश्यकता असल्याने गरजू पात्र लाभार्थी तहसील कार्यालयात दुय्यम शिधापत्रिकेसाठी येत आहेत. लाभार्थ्यांची शिधापत्रिका ऑनलाईन नोंद झालेली आहे आणि त्यांना बारा अंकी शिधापत्रिका क्रमांकही प्राप्त आहे. परंतु त्यांची शिधापत्रिका जीर्ण झाली आहे किंवा हरविलेली आहे, अशा लाभार्थ्यांना तहसील कार्यालय स्तरावरुन ई-शिधापत्रिकेचा लाभ देण्यात येत आहे. त़्यामुळे जुनी किंवा फाटलेली शिधापत्रिका असल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांनी ई-शिधापत्रिका लाभ घेऊन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाल यांनी केले आहे.



मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांनी ई- शिधापत्रिकेचा लाभ घेऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरीता कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्डच्या छायांकीत प्रतीसह रितसर अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. पुंजल यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments