Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

वसमत शहरातील स्वच्छतेसाठी न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन

 



वसमत / खदीर अहेमद

वसमत शहरातील नागरीक, महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले शहरातील नागरीकांना मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती झालेली आहे. ज्यात प्रामुख्याने शहरातील नागरीकांना पिण्याचे पाणी, शहरातील स्वच्छता इत्यादी बाबींना प्राधान्यक्रम आहे. परंतु वसमत शहरातील साफसफाई, स्वच्छतेचा विचार केल्यास वसमत शहरात नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहे किंवा नाही हे कळावयास मार्ग नाही. 

वसमत शहरातील मुख्य रस्ते, शासकिय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, मंदीर, मस्जिद, मुख्य चौक, मोकळ्या जागा इत्यादी ठिकाणी सतत कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत, शहरातील नाल्या तुंबलेल्या आहेत परंतु साफसफाई, नाल्या सफाईकडे नगर परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. त्यामुळे नगर परिषदेमध्ये स्वच्छता विभाग आहे किंवा नाही याचा प्रश्न शहरातील सामान्य नागरीकांना पडलेला आहे. स्वच्छतेसाठी नागरीक, सामाजिक कार्यकर्ते यांची सतत ओरड, निवेदने प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही चालु असल्याचे नागरीकांना भासविण्यात येते. आज शहरातील कोणत्याही भागात जा कचऱ्याचे ढिग व तुंबलेल्या नाल्याच दिसून येतील तसेच जिथे कुठे कचरा उचलला, नाली साफ केली आहे ती घाण रस्त्यावरच पडून असतो तो कचरा उचलून नेण्यास कधी मुहूर्त लागेल हे निश्चित नाही. आता पावसाळयाचे तसेच सणाचे दिवस येत आहेत परंतु अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात घालून नागरीकांना बाहेर पडावे लागत आहे. सतत घाण, दुर्गंधीमुळे डास व इतर किटकांचा प्रादुर्भाव वाढला असून कुटुंबातील जेष्ठ, लहान बालके आजारी पडत असून साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनास शहरातील स्वच्छतेबाबत कोणतेही गांभीर्य नाही, शहरात स्वच्छता साफसफाईची कुठलेही काम दिसून येत नाही असे निवेदनात नमूद असून त्यावेळी संजय भोसले, समद फारुकी, आनंद बडवणे, लक्ष्मण पटवे व अन्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments