वसमत / खदीर अहेमद
अखिल भारतीय स्तरावरील साखर उद्योगातील नावाजलेले तांत्रिक अधिकारी व पदाधिकारी यांनी दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन ऑफ इंडीया, नवी दिल्ली ह्या संस्थेची सन १९२५ ला स्थापना केली आहे. सदरची संस्था साखरेसंबंधीचे धोरण ठरवितांना केंद्र शासनास सल्ला देऊन महत्वाची भूमिका पार पाडत असते.
सदरील संस्थेकडून साखर उद्योगाची प्रगती व विकास कामासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा "लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड" हा संस्थेचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत असतो
या बाबत सविस्तर माहिती अशी की शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन ऑफ इंडीया नवी दिल्ली या संस्थेने सदर पुरस्कारासाठी वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर यांची निवड केली आहे.
सदर पुरस्कार दि.३० जुलै २०२४ रोजी संस्थेच्या ८२ व्या वार्षिक संम्मेलनाचे उद्घाटन समारोह जयपुर (राजस्थान) येथे प्रदान करण्यात येणार आहे.
त्याप्रसंगी वसमत विधानसभा क्षेत्रामध्ये जयप्रकाश दांडेगावकर यांचा जागोजागी सत्कार करण्यात येत असून आज रोजी वसमत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष शेख मोहम्मद अयुब पॉप्युलर यांच्या घरी त्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मौलाना मंजूर अहमद,जिल्हाध्यक्ष फारुख भाई,मोहम्मद रौफ भाई,प्रकाश इंगळे सर,हाजी खमर अली, कासिम पापुलर, अफसर भाई लढ्ढा, मोहम्मद सिद्दीक, सेवा दलाचे बाबुभाई, तोफिक पॉप्युलर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments