वसमत मध्ये माझी लाडकी बहीण योजनेसाठी नगर परिषद सरसावली
पाच ठिकाणी अर्ज भरण्याची केली व्यवस्था
वसमत / खदीर अहेमद
नगर परिषद वसमत कडून शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना अंतर्गत शहरातील सर्व महिला यांना योजनेचे अर्ज भरून घेणे यासाठी वसमत शहरामध्ये एकूण 5 ठिकाणी मदत कक्ष सुरु करण्यात आलेले आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनालाभ घ्यावा यासाठी खालील ठिकाणी मोफत अर्ज भरणे सुरु आहे.. 1. चौगुले सभागृह, वसमत 2. महात्मा फुले शाळा, कौठा रोड, वसमत 3. महात्मा गांधी विद्यालय, कारखाना रोड, वसमत 4. नगर परिषद ग्रंथालय, शुक्रवार पेठ, वसमत 5. नगर परिषद कार्यालय वसमत.याठिकाणी मोफत अर्ज भरण्यासाठी मदत कक्ष सुरु करण्यात आलेले आहेत. या योजने अंतर्गत जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्यात यावा असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद वसमत यांचेकडून करण्यात येत आहे.
0 Comments