वसमत / खदीर अहेमद
वसमत आज दिनांक ०३ मार्च २०२४ टेंभुर्णी येथे वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया उर्फ चंद्रकांत नवघरे यांच्या हस्ते ५८ लक्ष रुपये किमतीचे विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यामध्ये न्याय सभागृह १५ लक्षरुपये,मुस्लिम समाज कब्रस्तान संरक्षण भिंत १० लक्षरुपये,जिल्हा परिषद वर्ग खोली बांधकाम ११ लक्ष रुपये,संत सावता माळी सभागृह १५ लक्ष रुपये,ओपन जिम उदघाटन ७ लक्ष रुपये अश्या समाज उपयोगी विकास कामांचे आज मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयप्रकाश दांडेगावकर साहेब उपस्थित होते. याशिवाय पूर्णा सहकारी साखर कारखाना संचालक गजानन सवंडकर,राष्ट्रवादी काँग्रेस सर्कल अध्यक्ष उत्तम सवंडकर, सरपंच शेख हसन , शेख यासीन माजी सरपंच गणेश आलने, माजी सरपंच माधवराव सवंडकर, ग्रामपंचायत सदस्य रंगनाथराव सवंडकर, मारोतराव सवंडकर, शेख खय्युम, माजी सरपंच प्रल्हादराव सवंडकर, उमराव अण्णा सवंडकर, रंगनाथराव सोनवणे, सवंडकर जयवंतराव साहेबराव आलने व समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments