वसमत / खदीर अहेमद
वसमत विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैय्या नवघरे यांच्या स्थानिक विकास निधीतून बहिर्जी स्मारक महाविद्यालयीन परिसरात भव्य स्वरूपाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका यांचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैय्या नवघरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जयप्रकाश दांडेगावकर याची प्रमुख उपस्थिती होती.
वसमत मधील विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षा केंद्राचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वसमत मधील तरुणांना पुण्यासारख्या महानगरामध्ये जावे लागते आणि यासाठी खाजगी शिकवणीसाठी मोठ्या प्रमाणात फीस द्यावी लागते . याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी कितीही काटकसर केली तरी दरमहा ८ ते १० हजार रुपायाच्या खर्च त्यांना करावा लागतो. याहिपेक्षा कुटुंबापासून लांब राहावे लागते. तसेच बऱ्याच तरुणींनाही मोठ्या शहरामध्ये पाठवण्यासाठी पालक तयार नसतात आणि यामुळे मुलींचे शिक्षण सुटले जाते. म्हणून जर आपल्याच वसमत मध्ये स्पर्धा परीक्षा केंद्राची सुविधा झाली तर या सर्व अडचणींना मात करता येते.
याशिवाय,वसमत मध्ये जर जास्तीत जास्त तरुण तरुणी प्रशासकीय सेवेत मध्ये गेले तर आपल्या वसमत नगरीचे नागरिक उद्या देशाचं नेतृत्व करतील आणि यामुळे वसमतलाही भविष्यामध्ये उत्कृष्ट प्रशासक भेटतील. याशिवाय इतर शासकीय नोकऱ्या मिळवून देणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जर केला तर त्यांचा रोजगाराचा प्रश्न देखील कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
यावेळी इतर प्रमुख उपस्थिती मध्ये अॅड मुंजाजीराव जाधव,पंडितराव देशमुख,अॅड. रामचंद्र बागल, उमाकांतराव शिंदे,नितीन महागावकर,राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत बागल व विद्यर्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments