Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

थायलंड येथून वसमत मध्ये आणलेल्या भगवान गौतम बुद्ध मूर्तीचे जल्लोसात आगमन


 

वसमत / खदीर अहेमद

वसमत नगरीतील पंचशील नगर, पंचशील बुद्ध विहार येथे थायलंड येथून गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने भगवान गौतम बुद्ध मूर्ती दान स्वरूपात मिळाली थायलंड देशातून भारतामध्ये अनेक भगवान गौतम बुद्धाच्या मूर्ती प्राप्त केल्या जात आहेत . वसमत शहरात त्या भगवान गौतम बुद्ध मूर्तीचे वसमत येथे 26 फेब्रुवारी 24 रोजी थाटामाटतात आगमन झाले .



 यावेळी शहरातून भव्य बुद्ध मूर्तीचे वसमत मध्ये स्वागत व अभिवादन रॅली काढण्यात आली. यामध्ये पंचशील गृहनिर्माणचे अध्यक्ष के. आर मनोहरे सर, किसनराव रणवीर, डि.के. थोरात, के.डी.वाटोडे, रावजी खंदारे, सुनील मनोहरे व पंचशील नगर वसमत येथील सर्व आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार व उपासक उपासिका उपस्थित होते. सदरील बुध्दरूप प्रतिमांचे दान के .आर . मनोहरे सर यांच्या कालवंश पत्नी श्रीमती कांताबाई कुंडलिकराव मनोहरे यांच्या दानातून मिळाली आहे .



     सदरील रॅलीमध्ये प्रामुख्याने सिताराम म्यानेवार नगर सेवक, यशवंत उबारे शासकिय गुत्तेदार, गौतम मोगले . रवि डोळसे . यशवत थोरात . आधी सर्व मंडळी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments