हिंगोली / खदीर अहेमद
हिंगोली जिल्हयामध्ये अनेक मोटर सायकल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याबाबत पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते. नमुद मोटर सायकल चोरणारी टोळीला पकडुन नमुद गुन्हे उघड करणे याचे पोलीसांपुढे आव्हाण निर्माण झाले होते.
पोलीस अधिक्षक श्री. जी श्रीधर यांनी सदर मोटर सायकल चे गुन्हे उघड करण्या संदर्भाने पोनि विकास पाटील यांना सुचना देउन स्थागुशाचे पथके स्थापन केले होते. पोलीस पथकाने घटनास्थळाला व्हिजीट करून बारकाईने पाहणी करून गोपनिय माहीती काढली असता गोपनिय सुत्रा व्दारा माहिती समजली की, आरोपी नामे दिनेश उत्तम रनविर वय २३ वर्ष व्य. मजूरी रा.पाचोंदा ता. माहूर जि. नांदेड याने त्याचे इतर साथीदारासह विवीध भागातून मोटर सायकल चोरी केल्या असुन चोरी केलेल्या मोटर सायकल कमी किंमतीमध्ये विकी केल्या आहेत. अशी गोपनीय माहीती मिळाल्या अनुशंगाने पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेवून दिनेश उत्तम रनविर रा. पावोंदा ता. माहूर जि. नांदेड यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता आरोपीने त्याचे साथीदारासह मोटर सायकली चोरी केल्याची कबूली दिली. सदर आरोपीचे ताब्यातून एकून २० मोटर सायकल कि.अं. ११,९०,००० रू मुददेमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस ताब्यात घेवुन पोस्टे हिंगोली ग्रामीण येथे अटक केले आहे. नमूद आरोपीने नांदेड, यवमतमाळ जिल्हयात सुध्दा मोटर सायकल चोरी केल्या आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विकास पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार सुनिल अंभोरे, लिंबाजी वाव्हळे, प्रेम वव्हान, किशोर सांवत, महादु शिंदे, विशाल खंडागळे, निरंजन नलवार, दत्ता नागरे, शेख इरफान यांनी केली
0 Comments