वसमत / खदीर अहेमद
बांगलादेश येथील हिंदुवर होणारे अत्याचार थांबावे
बांगलादेशी हिंदूंची यातुन सुटका व्हावी तसेच हिंदु धर्मावर वाढते धर्मांतरण यासाठी जागतिक स्तरावर भारत सरकारकडून लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी हिंगोली-नांदेड-परभणी जिल्हा पुर्ण बंद ठेवण्याची हाक देण्यात आली होती त्याअनुषंगाने
वसमत तालुक्यात सुध्दा आज दि.17/08/2024 रोजी संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
वसमत तालुक्यातील ग्रामीण भाग,शहरातील सर्व हिंदु बांधव ,भगिनी,महिलांनी या मोर्चात सहभागी झाले होते व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेऊन आपला पाठिंबा दर्शवला.
या बंदला हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचा,वसमत व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला होता यामध्ये कपडा,भुसार,आडत,सराफा,इलेक्ट्रॉनिक,इलेक्ट्रिक,किराणा सह इतर व्यापारी संघटनेचा पाठिंबा दर्शवला होता. आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते त्यामुळे वसमत शहरातील सर्व बाजारपेठ बंद होती.
17 तारखेला दुपारी एक वाजता शिवतीर्थ छ.शिवाजी महाराज पुतळा परिसर येथुन मोर्चा निघून मोंढा रोड-मामा चौक-झेंडा चौक-पोलीस स्टेशन-गवळी मारोती मंदिर-तहसिल कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
त्यावेळी वसमत शहरातील व तालुक्यातील हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
तसेच वसमत शहराचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी शहरांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त केला होता प्रमुख मार्गावर जगो जागी एसआरपीएफ व महाराष्ट्र पोलीस दल तैनात करण्यात आले होते.
0 Comments