वसमत / खदीर अहेमद
सकल मराठा समाजाच्या नागरिकांनी थांबविला तालुका
मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या आवाहनानुसार वसमत तालुक्यातील सकल मराठा समाजाने वसमत तालुक्याच्या सर्व सीमा वाहतुकीसाठी बंद केल्या होत्या सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत कडकडीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दरम्यान सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना आंदोलनातून सूट देण्यात आली होती तालुक्यातील अनेक महामार्ग राज्य मार्ग आणि गाव पातळीवरची रास्ता रोको आंदोलन यशस्वीपणे पार पाडले ज्यात थोरावापाटी काकबन , खांडेगावं, बळेगाव पाटी, चोंडी, कुरुंदा, सिंदगी, कोठारी, विशाल ढाबा गिरगांव पाटी, तसेच वसमत शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा शिवतीर्थ जवळील हुतात्मा बहिर्जी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याठिकाणी सकल मराठा समाजाच्या नागरिकांनी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन पुकारल्याने वाहतूक पुर्ण पने बंद करण्यात आली होती.
महाराष्ट्र शासनाने वाशी येथे दिलेले मराठा समाजाला आश्वासन पाळावे सगळे कायद्यात रूपांतर करावे व सकल मराठा समाजाचा सरसकट कुणबी मध्ये समावेश करून ओबीसी आरक्षण द्यावे आणि महाराष्ट्रातील आंदोलनात झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत या आणि इतर मागण्यासाठी हा बंद रास्ता रोको च्या रूपाने पाळण्यात आला.
उद्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे त्यामुळे पंचवीस तारखेला कुठलेही आंदोलन नाही दुपारी दोन वाजेपर्यंत आंदोलनाची पुढील दिशा समाजाच्या साक्षीनं मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत ठरणार आहे.
असे सकल मराठा समाजाच्या आजच्या नियोजित रास्ता रोको आंदोलनाच्या निवेदनावरून लक्षात येते.
0 Comments