Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

अल्पसंख्यांक वस्तीतील पायाभूत सुविधासाठी अडीच कोटींच्या कामांना मंजुरी


 आ.राजूभैय्या नवघरेंचा मतदार संघात विकास कामांचा धडाका 


वसमत / खदीर अहेमद

आज रोजी वसमत विधानसभा मतदार संघांचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैय्या नवघरे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण व शहरी भागातील अल्पसंख्यांक वस्तीतील पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज २ कोटी रुपये आणि वसमत शहरातील विकास कामांना ५० लक्ष रुपयांच्या विकास कामाना मंजुरी मिळाली आहे.

  यामध्ये हट्टा येथे शादीखाना बांधकाम करणे रुपये 30 लक्ष रुपये,गिरगांव येथे शादीखाना बांधकाम करणे 30 लक्ष रुपये,जवळा बाजार येथे शादीखाना बांधकाम करणे ३० लक्ष रुपये,शिरड शहापूर ता. औंढा नागनाथ येथे रज्जा मोहल्ला पाण्याच्या टाकीच्या बाजूला सभागृह बांधणे ३० लक्ष रुपये,कब्रास्तानास सरक्षण भिंत बांधकाम करणे १० लक्ष रुपये, ईदगाह परिसरात पेव्हर ब्लॉक करणे १० लक्ष रुपये, पठाण मोहल्ला येथे कब्रस्थानास संरक्षण भिंत बांधकाम करणे ५ लक्ष रुपये,कुरुंदा येथे दर्गा मोहल्ला संरक्षण भिंत बांधकाम करणे १० लक्ष रुपये,कुरुंदा ता. वसमत येथे ईदगाह परिसरात सुशोभीकरण करणे १५ लक्ष रूपये, जैनुभाई कुरेशी ते तकवा मोहल्ला पेव्हर ब्लॉक करणे २० लक्ष रुपये,वाखारी ता.वसमत येथे अल्पसंख्याक वस्तीत पाणीपुरवठा करणे, सौरपंप बसवणे, एलडी हायमास्ट व अनुषंगिक कामे करणे १० लक्ष रूपये.

तर वसमत शहरातील अल्पसंख्यांक बहुल भागात

 आ.राजूभैय्या नवघरे यांच्या प्रयत्नातून वसमत शहार अंतर्गत  नागरिकांच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वसमत न.प अंतर्गत गडी मोहल्ला येथे जि.प. उर्दू शाळेसमोर पेव्हर ब्लॉक करणे १५ लक्ष रुपये, न.प अंतर्गत फिजा कॉलनी येथे जबी भाई यांचे घर ते उबेद चाऊस यांच्या घरा पर्यंत मजबुतीकरन करने व नाली बांधकाम करणे १५ लक्ष रुपये, न.प अंतर्गत खान फंकशन हॉल परिसर येथे मजबुतीकरन, सी सी रस्ता व नाली बांधकाम करणे २० लक्ष रुपये अश्या विविध विकास कामांना मंजुरी मिळाल्याने वसमत शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीने आ.राजू भैय्या नवघरे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments