वसमत/ खदीर अहेमद
वसमत हे हिंगोली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या वसमत शहरासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बायपास रस्ता (वळण रस्ता) अखेर मंजूर झाला असून, आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे.
वसमत शहर हळदीची मोठी बाजारपेठ आणि होजियरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहराला सुरुवातीला अनेक नागरी समस्यांनी ग्रासले होते. मात्र, आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांनी वसमत विधानसभेचे आमदार म्हणून निवड झाल्यानंतर शहराच्या विकासासाठी एक कल्पक आणि दूरदृष्टीचा कार्यक्रम हाती घेतला.
वसमत शहर एक मोठी व्यापार पेठ असल्यामुळे वाहतूक समस्या हा एक कळीचा मुद्दा बनला होता. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीवर येणारा ताण, होणारे अपघात आणि वारंवार होणारी ट्रॅफिक जाम यामुळे नागरिक त्रस्त होते. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार नवघरे यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत अनेक बैठका घेतल्या आणि सखोल अभ्यास केला. त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वसमत शहरात बायपास असावा यासाठी अथक आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. बायपासचे महत्त्व आणि शहरातील नागरिकांची गरज त्यांनी गडकरी यांना पटवून दिली.
आमदार नवघरे यांच्या दूरदृष्टी आणि अथक परिश्रमामुळे वसमत शहराला एक महत्त्वाचा विकासाचा टप्पा गाठता आला आहे.
0 Comments