आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी : आ. राजुभैय्या नवघरे
वसमत / खदीर अहेमद
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आत्महत्या केलेल्या व सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वसमत विधानसभा मतदार संघातील गोविंद सोनाजी कावळे, वय वर्षे २१, रा. नहाद ता. वसमत जि. हिंगोली तसेच अकोली येथील लिंबाजी धोंडिराम कदम वय वर्षे ४८ व ता. वसमत जि. हिंगोली, सह रायवाडी ता. वसमत जि. हिंगोली, येथील गंगाधर भिमराव जमदाडे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आत्महत्या करून आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे.
तसेच रिधोरा ता. वसमत जि. हिंगोली, या गावातील कृष्णा देविदास भालेराव वय वर्षे २३ यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःला पेटवून घेतले आहे. त्यात तो ६० ते ७० टक्के जळालेल्या अवस्थेत आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालय मुंबई येथे उपचार घेत आहे. तरी त्याला सुध्दा मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत जास्तीत जास्त आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी.
त्याच्या पश्चात त्यांच्या कुटुंबावर बांधवांच्या कुटूंबियांवर दुखाचा डोंगर पसरलेला असुन तसेच घरातील कर्ते व्यक्ती गेल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी शासन स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करुन त्यांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व शासनाच्या इतर विविध योजना अंतर्गत मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी वसमत विधानसभेचे आमदार राजू भैय्या नवघरे यांनी केली आहे.
0 Comments