दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या,स्थानिक गुन्हे शाखा यांची धडक कार्यवाही
वसमत / खदीर अहेमद
मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. जी. श्रीधर साहेब यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारताच चोरी घरफोडी दरोडा चे गुन्हे घडु नये त्यावर नियंत्रण असावे म्हणुन सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नियमित तपासणी सतर्क रात्रगस्त व नाकाबंदी तसेच प्रभावी आठवडयातुन चारवेळा विशेष कॉम्बींग ऑपरेशन मोहीम राबविण्यात येत आहे.
दिनांक - ०३ / ११ / २०२३ रोजी मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. जी. श्रीधर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा यांनी धडक कार्यवाही करत. उप विभाग वसमत हददीत रात्रौ दरम्याण गस्त घालत जात असतांना गोपनिय माहिती मिळाली की, वसमत ते बाभुळगाव जाणाऱ्या रोडवर मळी नदिचे पुलाच्या बाजुला काही इसम हे अंधारात दबा धरून व एखादा गंभीर मालाविरूध्दचा गुन्हा करण्याचे उददेशाने तेथे थांबलेले आहेत. अशी खात्रीलायक बातमी मिळताच आम्ही पोस्टे वसमत ग्रामीण बिट अंमलदार यांना सोबत घेवुन मिळालेल्या माहितीचे ठिकाणी तात्काळ पोहचुन छापा मारला असता तेथे एकुण पाच इसम अंधारात इतरत्र पळुन जात असल्याचे दिसले आम्ही पाठलाग करून दोन इसमाना पकडले तेथे असलेल्या इसमापैकी तिन इसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. पकडलेल्या दोन इसमांच्या हालचाल ही संशयास्पद होत्या. इसम नाव १) रवी अनिल मारखे वय २२ वर्ष, रा. म्हारळगाव ता. कल्याण जि.ठाणे, २) राजु तुकाराम कासणे वय ३० वर्ष रा. वडगाव शिंदे ता. लोहगाव जि. पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन दरोडा टाकण्यासाठी वापरणारे हत्यार ज्यात मोबाईल ०२, खंजर ०१, व लोखंडी रॉड, पकड, मिरची पुड व दोरी असे साहीत्य असे साहीत्य जप्त करण्यात आले असुन वर नमुद आरोपी व घटनास्थळावरून पळुन गेलेले त्यांचे साथिदार १) सुरज नितीन जाधव रा. पुर्णा सहकारी साखर कारखाना बाभुळगाव ता. वसमत जि. हिंगोली व इतर दोन आरोपी असे एकुण ०५ इसमांविरुध्द पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण येथे फिर्यादी सहा. पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे तक्रारी वरून गुरनं. २४५ / २०२३ कलम ३९९ भादवी सह कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि यामावार हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरिक्षक पंडीत कच्छवे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शेख बाबर, विठठल कोळेकर, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, तुषार ठाकरे तसेच पो. स्टे वसमत ग्रामीण चे विजय उपरे, भुजंग भांगे यांचे पथकाने केली.
0 Comments