Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

हपसापुर शिवारात गांज्याच्या लागवड ठिकाणावर पोलिसांची कार्यवाही


 हपसापुर शिवारात गांज्याच्या लागवड ठिकाणावर पोलिसांची कार्यवाही

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

वसमत / खदीर अहेमद

मा. पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांचेकडुन अवैद्य धंदयाविरूध्द कार्यवाहीची विशेष मोहीम चालु असुन त्या अंतर्गत आज रोजी पोलीस स्टेशन हटा येथे गोपनीय बातमीदारा कडुन माहीती मिळाली कि, पो.स्टे. हटटा अंतर्गत मौ. हापसापुर या गावाती शेतकरी नामे १) गुलाब तुळशिराम सवंडकर वय ४५ वर्ष व्य. शेती २) आदर्श गुलाब सवंडकर वय २५ वर्ष व्य. शेती दोन्ही रा. हापसापुर ता. वसमत जि. हिंगोली याने त्याचे शेतात अवैद्य रित्या व शासनाने प्रतिबंधीत केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाची झाडे लावली आहेत तसेच अशी माहीती मिळल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलीस स्टेशन हटटा यांचे पथकाने त्याबाबत दोन सरकारी पंच व वनज काटा घेवुन मौ. हापसापुर येथील वरील आरोपीच्या कापसाचे शेतामध्ये छापा टाकला असता सदर शेतामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला गुंगीकारक वनस्पती गांजाची लागवडी केलेली लहान व मोठी २३५ झाडे जी पंचासमक्ष उपटुन त्यांचे वनज केले असता वजन ४५ किलो ६० ग्रॅम किंमत अंदाजे १०,८०,००० /- रु. सदर मुददेमाल सविस्तर पंचनामा करून पोलीसांनी जप्त केला. सदर घटनास्थळावरून शेतमालक आरोपी नामे १) गुलाब तुळशिराम सवंडकर वय ४५ वर्ष व्य. शेती व त्याचा मुलगा नामे २) आदर्श गुलाब सवंडकर वय २५ वर्ष व्य. शेती दोन्ही रा. हापसापुर ता. वसमत जि. हिंगोली यांना ताब्यात घेतले आहे.


सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरिक्षक स्थागुशा श्री. पंडीत कच्छवे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील स.पो.नि.श्री. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शेख बाबर, विठठल कोळेकर, गजानन पोकळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, तुषार ठाकरे व पोलीस स्टेशन हटट्ा चे पथकातील स.पो.नि. श्री. गजानन बोराटे, पोलीस अंमलदार जिवन गवारे, पोलीस अमलदार गजानन लेकुळे,भागोराव दिंडे, आसेफ शेख, यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments