Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

खुन प्रकरणतील एक वर्षापासुन फरार आरोपी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात


 खुन प्रकरणतील एक वर्षापासुन फरार आरोपी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात


 आरोपीस घातक हत्यारासह वसमत येथे ताब्यात घेतले


वसमत / खदीर अहेमद

पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर यांचे आदेशाप्रमाणे दिपावली सणानिमीत्त जिल्हयात स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांचे मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथक नेमुन विशेष पेट्रोलींग ठेवण्यात आली आहे.


त्याअनुषंगाने दिनांक १३.११.२०२३ रोजी स्थागुशाचे सपोनि घेवारे यांचे पथक वसमत उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, पोस्टे मानवत जिल्हा परभणी हददीत मागील एक वर्षापासुन मानवत खुन प्रकरणातील फरार आरोपी नामे रणसिंग कन्हयासिंग टाक वय ३० वर्ष रा. मानवत जि. परभणी हा शिकलकरी वस्ती वसमत येथे कमरेला खंजीर लावुन फिरत आहे अशी खबर मिळाल्यावरून पोलीस पथकाने तात्काळ शिकलकरी वस्ती रेल्वे स्टेशन परिसर वसमत येथे जावुन छापा मारून खुन प्रकरणातील फरार आरोपीस खंजरसह ताब्यात घेवुन पोस्टे वसमत येथे भारतीय हत्यार कायदयान्वये सपोनी शिवसांब घेवारे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपी हा परभणी पोलीसांना मागील एक वर्षापासुन मानवत खुन प्रकरणात चुकविण्यासाठी गुंगारा देत होता. अटक


सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक श्री पंडीत कच्छवे स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे सपोनि श्री. शिवसाब घेवारे, पोउपनि यामावार, अंमलदार शेख बाबर, नंदकुमार सोनवणे, अविनाश राठोड, आकाश टापरे, तुषार ठाकरे यांचे पथकाने पार पाडली.

Post a Comment

0 Comments