मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील पहिला विद्यार्थी मोर्चा
सरकारला इशारा म्हणून विद्यार्थी धडकले तहसील कचेरीवर
वसमत /खदीर अहेमद
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वारंवार आंदोलने, मोर्चे, उपोषणाद्वारे मागील अनेक वर्षापासून चालु असलेल्या लढयाची सरकारकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही व आता पुन्हा श्री. मनोज जरांगे पाटील तसेच सकल मराठा समाजामार्फत विविध साखळी उपोषणाद्वारे आंदोलने चालु आहेत.
मराठा समाजाचा मागील अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने चालणारा लढयाबाबत सतत चालढकल व कोणताही समाजहिताचा ठोस निर्णय न झाल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून सरकारला इशारा देण्यात येत आहे की, 2 महिन्यात कायमस्वरूपी टिकेल असे आरक्षण न दिल्यास सर्व विद्यार्थ्यांकडून पुढील शिक्षणावर बहिष्कार राहील व पुढील शैक्षणिक नुकसानची सर्वस्वी जबाबदारी ही राज्यांचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, व सरकारची राहील.
तरी सरकार ने याची गांभीर्याने नोंद घ्यावी अश्या मागणी चे निवेदन विद्यार्थ्यांच्या वतीने आज रोजी वसमत तहसील कार्यालया मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे.
0 Comments