ट्रॅक्टर चोरीची फिर्याद देणाराच निघाला आरोपी
स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कार्यवाही
वसमत / खदीर अहेमद
दिनांक ३१.१०.२०२३ रोजी पोलीस स्टेशन बाळापुर येथे फिर्यादी नामे नितीन गौतम इगोले वय ३३ वर्ष धंदा शेती रा. साळवा ता. कळमनुरी जिल्हा हिंगोली याने स्वःताचा सोनालीका ट्रॅक्टर हेड ज्याचा पासींग क्रमांक MH-35-AQ1624 असा असलेला ट्रॅक्टर हेड हा राहते घरासमोरून दिनांक २९/१०/२०२३ रोजी रात्री चोरी गेल्यासंदर्भाने तकार दिली होती. त्याअनुषंगाने पोस्टे बाळापुर येथे गुरनं ६७१ / २०२३ कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा दाखल होता.
पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर यांनी सदर गुन्हयाचा संमातर तपास करून गुन्हा उघड करण्याच्या सुचना पोनि श्री. पंडीत कच्छवे स्थागुशा यांना देवुन सपोनि शिवसांब घेवारे, स्थागुशा यांचे नेतृत्वात एक विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.
दिनांक ०३/११/२०२३ रोजी तपास पथकाने सदर गुन्हयातील फिर्यादी नामे नितीन गौतम इगोले वय ३३ वर्ष धंदा शेती रा. साळवा ता. कळमनुरी जिल्हा हिंगोली यास सदर गुन्हयासंदर्भाने विचारपुस केली असता फिर्यादीने सदर ट्रॅक्टर हेड हे L&T Finance कंपनीकडुनवर हप्त्यावर घेतल्याचे सांगीतले तसेच उसने वाहतुकीचे पैसे सुध्दा उचलल्याचे सांगीतले. पोलीस पथकाने फिर्यादीची अधिक विचारपुस केली असता फिर्यादी उडवा उडवीचे उत्तर देत होता. सदरची बाबही पोलीसांचे चाणाक्ष नजरेतुन सुटली नाही.
पोलीस पथकाने फिर्यादीस अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता फिर्यादीने सदर ट्रॅक्टर हेडवरील फायनान्स कंपनीचे कर्ज बुडविण्याचे उददेशाने फिर्यादीचा मित्र नामे शेख अनिस शेख गनी वय ४० रा तोफखाना हिंगोली याचे मार्फतीने ट्रॅक्टर चोरी करण्यास सांगीतले. तसेच पोलीस स्टेशन बाळापुर येथे सदर ट्रॅक्टर हेड चोरीची खोटी फिर्याद दिल्याचे सांगीतले. पोलीसांनी आरोपी शेख अनिस यांस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांने सांगीतले की, सदर ट्रॅक्टर हेडवरील L&T Finance कंपनीचे कर्ज बुडविण्याकरीता व भरलेले डाउन पेमेंट मिळविण्याकरीता फिर्यादीसोबत संगनमत करून असा कट रचुन ट्रॅक्टर हेड चोरी केल्याचे सांगुन ट्रॅक्टर हेड काढुन दिले. त्यावरून पोलीसांनी ट्रॅक्टर हेड किमंत अंदाजे ०५ लाख रूपयाचा मुददेमाल जप्त करून फिर्यादी नामे नितीन गौतम इंगोले वय ३३ वर्ष धंदा शेती रा. साळवा ता. कळमनुरी जिल्हा हिंगोली व त्याचा मित्र नामशेख अनिस शेख गनी वय ४० रा तोफखाना हिंगोली यास ताब्यात घेवुन पोस्टे बाळापुर येथे हजर केले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक श्री पंडीत कच्छवे स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे सपोनि श्री शिवसांब घेवारे, अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, तुषार ठाकरे, दत्ता नागरे यांचे पथकाने पार पाडली.
सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बाळापुर येथे कलम 420 120 ब प्रमाणे फायनान्स कंपनीची फसवणूक करणे, कारखान्याचे पैसे बुडवणे, तसेच ट्रॅक्टर विकून पुन्हा पैसे मिळविणे अशा कार्यवाही निमित्त गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
0 Comments