मराठा आरक्षण प्रश्नी खा.हेमंत पाटील यांचा खासदारकीचा राजीनामा
वसमत / खदीर अहेमद
सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण प्रश्नी वातावरण तापले असून प्रत्येक गाव तालुक्याच्या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने उपोषण व आंदोलन करण्यात येत आहेत.त्यात सर्वच पक्षांच्या नेत्यांना गाव बंदीचे फलक लावले गेले आहेत.
आज रोजी हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांनी आपला मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे पाठवलं आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षा पासून प्रलंबित आहे, या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तिव्र असून, मी अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी, शेतकन्यांसाठी भांडणारा कार्यकर्ता आहे, आरक्षणाच्या आंदोलनासाठी माझा पाठींबा असून, आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.








0 Comments