Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

विविध गुन्ह्यातील हस्तगत केलेला २४ लाखांचा मुद्देमाल फिर्यादीस परत

 

विविध गुन्ह्यातील हस्तगत केलेला २४ लाखांचा मुद्देमाल फिर्यादीस परत


वसमत / खदीर अहेमद

मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे संकल्पनेतून हिंगोली जिल्हा घटकातील पो.स्टे. चे गुन्हयातील आरोपीकडुन हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबवुन एकुण २४,३८,२००/- रुपयाचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत


मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली श्री. जी श्रीधर सा. यांचे संकल्पनेतुन हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. अंतर्गत दाखल गुन्हयातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करणेबाबत विशेष मोहीमेचे आयोजन करुन जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादीस पतर करण्याबाबत हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावर मोहीम राबविण्याबाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या होत्या.


त्याअनुषंगाने दिनांक ३१.१०.२०२३ रोजी हिंगोली जिल्हा घटकातील सर्व पो.स्टे. स्तरावर गुन्हयात आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल, फिर्यादीस परत करण्याबाबत मोहीम राबविण्यात आली असुन सदर मोहीमे दरम्यान जिल्हयातील एकुण ०७ गुन्हयातील सोन्या चांदीचे दागीने व नगदी असे किमती ५,७३,५००/- रु २१ वाहने किंमत १५,१०,०००/- रु २१ मोबाईल फोन किंमत २,८०,०००/- रु. व ईतर मुद्देमाल ७४,७००/- असा एकुण २४,३८, २००/- रु मुद्देमाल आज रोजी फिर्यादीस परत करण्यात आला आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर साहेब यांनी हिंगोली जिल्हयाचा चार्ज घेतल्यापासून आतापावेतो अशाच प्रकारची मोहीम राबवुन एकुण जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन एकुण २,७२,४७,०९२ /- ( दोन कोटी बहात्तर हजार सत्तेच्याळीस हजार व्यानव रुपये ) चा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपुर्वक परत करण्यात आला आहे.


सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक श्री. जी. श्रीधर सा. मा. अपर पोलीस अधीक्षक, अर्चना पाटील, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा पंडीत कच्छवे, पोह सुनिल अंभोरे, व सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी व पो.स्टे.चे मुद्देमाल मोहरील यांनी अथक परिश्रम घेवुन पार पाडली आहे. भविष्यात अशाच प्रकारे मोहीम राबवुन जास्तीत जास्त जप्त मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments