मराठा आरक्षण मागणी साठी हेमंत पाटील यांचं दिल्लीत उपोषण
वसमत / प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण प्रश्नांवर वातावरण ढवळून निघाले आहे मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणे व आंदोलने करण्यात येत आहे नेते आणि कार्यकर्ते आपल्या पदाचा त्याग करून राजीनामे देत आहेत आणि आपली समाजाप्रतीची निष्ठा सिद्ध करीत आहेत.
हिंगोली लोकसभेचे खासदार असलेले हेमंत पाटील यांनी सुद्धा आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे हेमंत पाटील हे राजीनामा दिल्या पासून दिल्ली मध्ये संसदेत उपोषणास बसले आहेत.
तसं पाहता मराठवाड्याला हेमंत पाटील हे नाव मराठा समाजाला आज पासुन नाही तर गेल्या ३० वर्षा पासुन माहीत आहे विद्यार्थी दशेत मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाज कार्याला सुरुवात करणाऱ्या खा. हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी कित्येक मोर्चात आंदोलने केलीत.
विधानसभेत जेंव्हा जेंव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा निघाला तेंव्हा तेंव्हा त्यांनी तो उचलून धरला आणि २०१९ ला नांदेड मधून हेमंत पाटील एकमेव आमदार होते ज्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.
आणि २०१९ नंतरही खासदार झाल्यावर लोकसभेतही वेळोवेळी मराठा आरक्षणाची दखल दिल्लीला घेण्यास भाग पाडलं
ज्या समाजानं आपल्याला मोठं केलं त्या समाजाच आपणही काही देणं लागत ही भावना मनात ठेऊन कुठलाही विचार नकरता त्यांनी आपल्या खासदार पदाचा राजीनामा दिला फक्त राजीनामा देऊन न थांबता आज एकमेव हेमंत पाटील दिल्लीमध्ये संसदेत मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत.
0 Comments