Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

तुरीच्या पिकात १६८ गांजाच्या झाडासह ९१,७२८/- रुपयाचा मुद्देमाल जप्त, वसमत ग्रामीण हद्दीतील मुडी शिवारात पोलिसाचा छापा


 तुरीच्या पिकात १६८ गांजाच्या झाडासह ९१,७२८/- रुपयाचा मुद्देमाल जप्त, वसमत ग्रामीण हद्दीतील मुडी शिवारात पोलिसाचा छापा


          वसमत / खदीर अहेमद

हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्याचा शोध घेऊन कार्यवाही करीत आहे.

         दिनांक २५/ १० /२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वसमत उपविभागात अवैध व्यवसायाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की; मौजे मुडी येथील इसम नामे धुराजी उर्फ राजू शेषराव पडोळे वय ३५ राहणार मुडी याने स्वतःच्या तुरीच्या पिकामध्ये गांजाचे अंतर पीक घेतले आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेत चे सपनि शिवसांब घेवारे व त्यांचे पथक मौजे मुडी शेतशिवारातील गट क्रमांक १२५ मध्ये जाऊन पंचासह छापा मारला असता सदर शेतामध्ये तुरीच्या ओळीमध्ये गांजाचे लहान-मोठे १६८ झाडे /रोपे मिळून आली. सदर गांजाचे झाडे चे एकूण वजन ३.८२२ किलोग्रॅम किमती अंदाजे ९१ हजार ७२८ रुपयेचे मिळून आले.

       सदर गांजाचे रोपे लावणारा आरोपी धुराजी उर्फ राजू शेषराव पडोळे रा मुडी यांच्या विरोध पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक श्री पंडित कच्छवे स्थागुशा, पोनि चंद्रशेखर कदम वसमत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोउपनि यामावार, पोलीस अंमलदार उपरे, गणेश लेकुळे ,आकाश टापरे ,नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे, भांगे, मपोह गिरी, तसेच नायब तहसीलदार श्री विलास तेलंग, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, तलाठी प्रवीण पांडे, कृषी सहाय्यक शेख अब्दुल रझाक यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments