खासदार हेमंत पाटील यांनी 11 गावच्या विजेचा प्रश्न सोडविल,रोहीत्र बसवून विद्युत पुरवठा सुरळीत सुरू
वसमत / खदीर अहेमद
वसमत तालक्यातील जवळा बाजार सर्कल मधील ११ गावची मागील 1 महिन्यापासून वीज खंडित करण्यात आली होती. या गावातील विजेच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना देखील फटका सहन करावा लागत होता. खासदार हेमंत पाटील यांनी हा प्रश्न निकाली काढून शेतक-यांना शेतीसाठी लागणारी वीज उपलब्ध करून शेतक-यांना रब्बी पिकासाठी लागणारा विद्युत पुरवठा नवीन रोहित्र बसवून दिल्याने सुरळीत सरू करण्यात आला. यामुळे शेतकरी आणि विद्यार्थी वर्गातून समाधान करून खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले आहेत.
खरिपानंतर शेतक-यांनी रब्बीच्या
पेरणीला सरवात केली असून गहू, हरभरा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे परंत शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा वसमत तालुक्यातील जवळा बाजार सर्कल मधील नागेशवाडी, पुरजळ, रांजाळा वड़द, आजरसोंडा, नालेगाव, टाकळगव्हाण, पोटा खुर्द, आसोला तर्फ औंढा कोंडशी शिरला या गावांचा विद्युत पुरवठा ३३ के.व्ही. उपकेंद्रातील ५ किलो वॅटच्या शेती पंपाचा ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे मागील एक महिन्यापासून खंडित झाला होता. यामुळे या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नकसान होत होते. याबाबत खासदार हेमंत पाटील यांच्या कळमनुरी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडे तक्रार दाखल होताच तात्काळ त्यादृष्टीने कारवाई करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली. खासदार हेमंत पाटील यांनी
स्वतः हिंगोली जिल्हा महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधून व पत्र देऊन संबंधित गावातील शेतीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या यावर महावितरण विभागाने तातडीने कारवाई करून अवघ्या दोन दिवसात ५ किलो वॅटचा टान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला आणि विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला. ऐरवी सरकारी काम आणि महिनाभर यांच अशी परिस्थिती असताना सर्व सामान्य माणसाला याचा सामना करावा लागतो परंत लोकप्रतिनिधीनी दखल घेताच सर्व यंत्रणा गतिमान झाल्याचा प्रत्यय आला यामळे जवळा बाजार सर्कल मधील संबंधित गावातील शेतीचा प्रश्न मार्गी लागून शेतीसाठी सुरळीत विद्युत पुरवठा झाल्यामळे या भागातील शेतकऱ्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या कार्याचे आणि त्यांच्या यंत्रणेचे कौतक करून आभार मानले आहेत. शेतकरी यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असलेले खासदार हेमंत पाटील प्रामख्याने प्राधान्य देऊन सोडविले आहेत.
0 Comments