Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

विकसित भारत संकल्प यात्रा हिंगोलीत "सामान्य जनतेला मा.मोदीजीच न्याय देऊ शकतात" -रामदास पाटील सुमठाणकर


 विकसित भारत संकल्प यात्रा हिंगोलीत

"सामान्य जनतेला मा.मोदीजीच न्याय देऊ शकतात"

-रामदास पाटील सुमठाणकर


हिंगोली / खदीर अहेमद

आज हिंगोली विधानसभा क्षेत्रातील आडगाव मुटकुळे या गावी "विकसित भारत संकल्प यात्रा" दाखल झाली होती. या विकसित भारत संकल्प यात्रेच्या 

माध्यमातून सरकार आपल्या दारी आले असल्याचे  सांगून या माध्यमातून आयुष्मान भारत,प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना,

दीनदयाल अंत्योदय योजना, प्रधान मंत्री आवास योजना,प्रधानमंत्री उज्ज्वला योजना;प्रधानमंत्री

विश्वकर्मा; प्रधानमंत्री किसान सम्मान; किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान; जन धन योजना; अटल पेंशन योजना

स्त्रियांसाठी धूरमुक्त स्वयंपाक उज्वल्ला गॅस योजना इत्यादी या योजनाचा प्रसार व प्रचार करणे त्यांची माहिती समाजातील शेवटच्या माणसाला देणे हा मुळ उद्देश असल्याचे रामदास पाटील सुमठाणकर म्हणाले.

यावेळी पूर्व संघटन मंत्री भाऊराव जी देशमुख, मा आ तानाजीराव मुटकुळे,भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे, मा बाबारावजी बांगर साहेब, मा.के.के शिंदे साहेब, नारायणराव खेडकर मामा,मा तहसीलदार वगवाड साहेब, मा गटविकास अधिकारी बोथिकर साहेब, मा डॉ.कोरडे साहेब, सतीश दादा खाडे, सभापती हरीशचंद्र शिंदे मामा, कैलास सेठ काबरा, गोल्डी सेठ,हमीद भाई, रजनीताई पाटील, शैलेश जैस्वाल, सरपंच ज्ञानोबा मुटकुळे, कार्यकारी अभियंता दाणे साहेब, पाटील साहेब, ग्रामसेवक, तलाटी, तसेच हमीद भाई प्यारेवाले,संतोष भाऊ टेकाळे, अमोल तिडके, adv अमोल जी जाधव, मंडळ अध्यक्ष माणिक लोढे, हिंमत राठोड,कांतराव घोंगडे,मनोज शर्मा आणि गावातील लाभार्थी, परिसरातील सरपंच उपस्तित होते

15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ही यात्रा संबध भारत भर चालणार असल्याचे सांगून, जननायक बिरसा मुंडा जयंती दिवशी सुरु झालेल्या या यात्रेतून विविध केंद्रीय आणि राज्य योजनांची माहिती समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे,हे यात्रेचे उद्दिष्ट असल्याचे मोदी सरकारचे धोरण आहे असेही म्हणाले. आणि ह्या योजनाची माहिती प्रशासनाने काळजीपूर्वक पोहचवावि असेही मत मांडले.

सरकारी योजनांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनमानात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असल्याने मोठ्या प्रमाणात सामान्य माणूस मोदी साहेबांच्या सोबत असल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments