Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

उप विभागीय कार्यालयातून चोरीस गेलेल्या टीप्पर चा स्थानिक गुन्हे शाखेने लावला शोध


 उप विभागीय कार्यालयातून चोरीस गेलेल्या टीप्पर चा स्थानिक गुन्हे शाखेने लावला शोध


वसमत / खदीर अहेमद

दिनांक 20/ 10/ 2023 रोजी वसमत येथील उपविभागीय कार्यालय परिसरातून अवैध वाळू चे  जप्त केलेले टिप्पर चोरी गेल्यासंदर्भाने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता.

 सदर टिप्पर चोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि. 25/11/23 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि घेवारे व त्यांचे पथक यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदर टिप्पर मालक श्रीकांत उर्फ शिरू बोकारे राहणार रहाटी तालुका जिल्हा नांदेड यास ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर टिप्पर तो स्वतः व त्याच्यासोबत गोविंद बोकारे , राम बोकारे असे मिळून चोरून नेल्याचे सांगितले, तसेच सदर टिप्पर भंगार दुकानदार खाजा शेख राहणार नांदेड यांच्यामार्फतिने तोडल्याचे सांगितल्यावरून पोलीस पथकाने सदर टिप्पर चे तुकडे जप्त करून चारही आरोपींना आरोपी बनविले आहे. तसेच पोलीस स्टेशन वसमत येथे 5,50,000/- चा मुद्देमाल  व आरोपी हजर केले आहे .

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, आकाश टापरे, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments