वसमत / खदीर अहेमद
आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या संकल्पनेतून नवरात्र महोत्सव निमित्त वसमत शहरातील महिला करीता रेणुकामाता देवदर्शन यात्रा.300 गाड्या व हजारो माय-माऊल्यांना घेऊन माहूरच्या रेणुका माता दर्शनासाठी रवाना..
माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक मूळ जागृत पीठ होय. परशुरामांची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते.
महाराष्ट्रातील लाखो भाविक माहूरला दर्शनासाठी येतात. आमदार राजु भैय्या नवघरे यांच्या वसमत मतदारसंघातील माता-भगिनींना नवरात्र उत्सवात देवीचे दर्शन घडावे यासाठी एकूण 300 गाड्यांचा जथ्था घेऊन दर्शनासाठी निघालो आहोत.
विकास करताना प्रत्येकाची धार्मिक आस्था जोपासण्याचे काम आपण करतो, त्या माध्यमातून परमेश्वराचे व भाविकांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याची भावना होते. हे कार्य अविरत चालू ठेवण्याचा प्रयत्न करेल: आ.राजू भैय्या नवघरे
0 Comments