शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांचे निवेदन
वसमत / खदीर अहेमद
आज रोजी शिवसेना वसमत विधानसभा यांच्या कडून उप विभागीय अधिकारी वसमत आणि कार्यकारी अभियंता पूर्णा पाटबंधारे विभाग वसमत यांना निवेदन सादर करण्यात आले आहे येलदरी सिध्देश्वर इसापूर धरण यांच्या माध्यमातून शेती साठी पाणी पुरवठा करण्यात येतो पण पूर्णा पाटबंधारे विभागाचे कोणतेही नियोजन आद्याप जाहीर करण्यात आले नाही त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत की कोणते पीक घ्यावे ऊस लागवड करावी की नाही खरीप हंगाम संपला आहे आणि रब्बी च्या तयारी ला शेतकरी लागला आहे पण पूर्णा पाटबंधारे विभाग यांनी पाण्याचे कोणतेही नियोजन केले नाही त्यामुळे लवकर नियोजनसादर करून जाहीर करण्यात यावे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यानं दिलासा मिळाला पाहिजे यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख राजु दादा चापके विधान सभा प्रमुख मच्चिंद्रनाथ सोळंके माजी सभापती रामकिशन मामा झुन्झुर्ड शहर प्रमूख प्रभाकर क्षीरसागर माजी शहर प्रमूख बाबा अफूने राहुल राठोड विक्की कदम नवनाथ खराटे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments