वसमत / खदीर अहेमद
पोलीस अधिक्षक श्री.जी श्रीधर साहेब यांनी नवरात्रोत्सव अनुषंगाने स्पेशन ड्राईव्ह मध्ये अवैध धंदयाविरूध्द कार्यवाही करणेबाबत आदेशित केल्याने अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती अर्चना पाटील मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हटटा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. गजानन बोराटे यांनी गोपनिय माहीती काढुन पोलीस स्टेशन हददीतील जवळा बुद्रुक शिवारात ईसम नामे नारायण बाजीराव डाढाळे रा. जवळा बु याने त्याचे स्वतःचे शेतात गांजाची विनापरवाना लागवड केल्याची माहीती मिळाल्यावरून आज दिनांक १७ / १० / २०२३ रोजी दुपारी आडीच वाजण्याचे सुमारास सहा. पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनी पथकासह छापा मारला असता जवळा बुद्रुक शेत शिवारात नारायण बाजीराव डाढाळे रा. जवळा बु ता.वसमत याने त्याचे कापसाचे शेतात लहान मोठे गांजाचे ९ झाडे वजन ४.६०० किलो ग्रॅम किंमत ४६०००/- रू हे बेकायदेशिररित्या लागवड करून विक्री करण्याचे उददेशाने त्याची जोपासना व संवर्धन करतांना मिळुन आल्याने त्यास मुददेमालासह ताब्यात घेण्यात आले असुन सदर ईसमाविरूध्द पोलीस स्टेशन हटटा येथे (NDPS) कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. गजानन बोराटे, पोउपनि सतीश तावडे, पोलीस जमादार बालाजी जाधव, गणेश सुर्यवंशी, आसेफ शेख, मारोती गडगिळे, महेश अवचार, इकबाल शेख यांनी केली आहे.
0 Comments