Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

पोलीसांनी १० लाखाचे हरवलेले ६० मोबाईल शोधुन मुळ मालकास केले परत

  

वसमत / प्रतिनिधी 

पोलीस अधीक्षक श्री डॉ. नीलाभ रोहन यांनी हिंगोली जिल्हयातील नागरीकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधुन मुळ मालकास परत करण्यासंदर्भाने विशेष मोहीम राबवुन मोबाईल रिकव्हर करण्याबाबतच्या सुचना सायबर सेल हिंगोली व सर्व ठाणेदार यांना दिल्या होत्या त्याअनुषंगाने सायबर सेल हिंगोली व पोलीस स्टेशनच्या वतीने एकुण ६० गहाळ झालेले अॅन्ड्रॉईड मोबाईल किंमती १० लाख रूपयाचे हिंगोली जिल्हयातुन, इतर जिल्हयातुन तसेच परराज्यातुन रिकव्हर करण्यात आले असुन आज रोजी सदर मोबाईलच्या मुळ मालकास मा. पोलीस अधीक्षक श्री डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते परत करण्यात आले आहे.

हिंगोली पोलीसांतर्फे सर्व नागरीकांस सुचित करण्यात येते की, कुणीही पावतीविना सेकंडहॅन्ड मोबाईल खरेदी करू नये किंवा वापरू नये तसेच मोबाईल हरवल्यास तात्काळ स्वतः किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला जाउन CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर माहिती भरावी.

सदरची कार्यवाही श्री डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, हिंगोली, श्री. कमलेश मीना, अपर पोलीस अधीक्षक, श्री राजकुमार केंद्रे, उपविपोअ वसमत, श्री कुंदनकुमार वाघमारे, उपविपोअ हिंगोली शहर, श्री मयूर रसाळ, प्र पोलीस उपअधीक्षक, श्री मोहन भोसले, पोनि स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पो.नि. संदीप मोदे, गणेश राहीरे, शामकुमार डोंगरे, सुधीर वाघ, सपोनि संग्राम जाधव, विकास आडे, सोमनाथ घार्गे


 तसेच सायबर सेलचे सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार दत्ता नागरे, इरफान पठाण, मारोती काकडे, गणेश लेकुळे, प्रदीप झुंगरे, प्रणिता मोरे यांनी मोबाईल हस्तगत करणेबाबत महत्वाची कामगीरी बजावली आहे.


जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली

Post a Comment

0 Comments