Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

मोंढा फिडर ओव्हरलोड; वारंवार ट्रिपिंगमुळे नागरिक हैराण समस्या सोडवण्यासाठी फिडर विभागणीचा निर्णय

 


वसमत :शहरातील मोंढा फिडरवर वाढलेल्या प्रचंड वीजभारामुळे वारंवार ट्रिपिंग होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. भीषण उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विजेचा वाढलेला वापर ही समस्या अधिकच गंभीर बनवत आहे. फिडरवरील ट्रिपिंग प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित असल्याने थोडासा ओव्हरलोड झाला तरी वीजपुरवठा खंडित होत आहे.

सध्या शहरात गॅसची कमतरता असल्याने अनेक नागरिकांनी स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे विजेचा वापर अचानक वाढून फिडरवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरही प्रचंड तापत असून, कुलिंगसाठी बसवण्यात आलेले चार कुलरही अपुरे ठरत आहेत. उष्ण वातावरण आणि वाढलेला भार यामुळे सतत ट्रिपिंग होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून मोंढा फिडरचे दोन भाग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार रेस्ट हाऊसखालचा परिसर ‘मोंढा फिडर २’ तर बहिर्जी कॉलनी व जोहर कॉलनी परिसर ‘मोंढा फिडर १’ अंतर्गत समाविष्ट करण्यात येणार आहे. या विभागणीमुळे वीजभार संतुलित राहून ट्रिपिंगची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रश्नावर आमदार राजू भैय्या नवघरे यांनी महावितरणच्या अधिकारी व वसमत शहराचे उपनगर अध्यक्ष इमरान अली यांच्यासोबत चर्चा करून तातडीने उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. फिडर विभागणीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना स्थिर वीजपुरवठा देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

सततच्या वीज खंडितामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

नागरिकांना आवाहन : वीज वापर मर्यादित ठेवा

महावितरणचे अभियंता नंद यांनी सांगितले की, “सध्या मोंढा फिडरवर विजेचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः उन्हाळ्यामुळे एसी, कुलर तसेच इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक असेल तेव्हाच जास्त वीज वापरणारी उपकरणे वापरावीत. अनावश्यक वापर टाळल्यास फिडरवरील भार कमी होऊन ट्रिपिंगची समस्या कमी होण्यास मदत होईल.”

तसेच, “फिडर विभागणीचे काम सुरू असून ते लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments