Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

गांजा तस्करीचे आंतरराज्य रॅकेट गुन्हे शाखा हिंगोली कडुन उध्वस्त, जवळपास १८ लाखांचा ८९ किलो गांजा जप्त

 

गांजा तस्करीचे आंतरराज्य रॅकेट गुन्हे शाखा हिंगोली कडुन उध्वस्त, जवळपास १८ लाखांचा ८९ किलो गांजा जप्त


वसमत / खदीर अहेमद

पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांना अवैध धंदयाविरूध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा लागवड व विकी विरूध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे सुचना पो. नि. श्री विकास पाटील, स्था.गु. शा. हिंगोली यांना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्था. गु. शा. चे सपोनि. श्री शिवसांब घेवारे यांचे पथक हे रात्रगस्तीवर होते. 

दिनांक ११/०१/२०२४ रोजी रात्रगस्त दरम्यान पो.स्टे. वसमत शहर, वसमत ग्रामीण हद्दीत स्था.गु.शा. पथक पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे खुदनापुर शिवारात विहिरीजवळ नागोराव विश्वनाथ चव्हाण याचे शेतामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी साठवणुक केली आहे व सदरचा गांजा हा परराज्यातुन खरेदी करून आणला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने, स्था.गु.शा.. पथकाने छापा कार्यवाहीकामी लागणारे सर्व साहित्यासह तात्काळ रवाना होवुन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला असता तेथे खाकी रंगाचे चिकट टेपने चिपकवलेले तब्बल ४० पुठ्याच्या बॉक्स मिळून आले. सदर बॉक्समध्ये गांजाच्या झाडाचा बारीक केलेला वाळलेला पाला पाचोळा हिरव्या रंगाचा उग्रट वास येत असलेला एकुण ८९ किलो १९८ ग्रॅम वजनाचा एकुण १७,८३,९६०/- रूपये किंमतीचा गांजाचा माल मिळाल्यामुळे तो जप्त करण्यात आला व सदरचा गांजा परराज्यातुन खरेदी करून आणुन स्वतःच्या शेतामध्ये साठवणुक करणारा आरोपी नामे आदिनाथ नागोराव चव्हाण, रा. खुदनापुर, ता. वसमत, जि. हिंगोली याचेविरुध्द सपोनि. श्री शिवसांब घेवारे, स्था.गु.शा. हिंगोली यांचे फिर्यादीवरून पो.स्टे. वसमत ग्रामीण गुरनं. ०५/२०२४ कलम ८ (क), २०(ब)ii एन.डी.पी.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पो.नि. श्री विकास पाटील, स्था. गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील स.पो.नि. श्री. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे. तसेच सदर छापा कार्यवाहीसाठी पो.स्टे. वसमत शहरचे पोउपनि. श्री महिपाळे, सपोउपनि शेख हकीम, मपोशि/मगर यांनी मदत केली.

Post a Comment

0 Comments