अल्प.विभागाच्या प्रदेशउपाध्यक्ष पदी मौलाना मंजूर अहेमद यांची निवड
वसमत / प्रतीनिधी
आज रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न झाली.
त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील असंख्य सभा आपल्या भाषणाने दणाणून सोडणारे वसमतचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खंदे कार्यकर्ते मौलाना मंजूर अहेमद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून पुनश्च फेरनिवड करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या दोन गटामुळे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी अल्पसंख्यांक विभागाची प्रदेश कार्यकारणी नव्याने गठित करून श्री जावेद हबीब यांची प्रदेश अध्यक्ष पदी निवड करून यांच्यावर पक्ष संघटन बळकट करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अल्पसंख्यांक विभागाचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या आढावा बैठकीमध्ये उपस्थित होते.
बैठकीत ज्यांचा कार्यकाळ अवधी संपला होता त्यांना मुदतवाढ देण्यात आली व काही नवीन नियुक्त्या करण्यात आल्या.
त्यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब यांच्यासह महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विभागाचे सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष व अल्पसंख्याक विभागाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments