Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

भाजप महिला जिल्हा आघाडी कडून काँग्रेस आ.धीरज शाहू यांचा जाहीर निषेध


 भाजप महिला जिल्हा आघाडी कडून काँग्रेस आ.धीरज शाहू यांचा जाहीर निषेध

वसमत / खदीर अहेमद

वसमत येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करूण पुतळा दहन करण्यात आला 

 आयकर विभागाच्या तपासातून काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू आणि त्यांच्या नातेवाईकांकडून 300 कोटीहून अधिक रोकड सापडली. या घबाड संपत्तीचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीच्या हिंगोली महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध करून धीरज प्रसाद साहू यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून व पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला.


 या भ्रष्टाचारा संबंधी काँग्रेस पक्षाला चांगलेच धारेवर धरण्यात आले व धीरज साहूना कडक शासन व्हावे अशी मागणी शासनाकडे महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.यावेळी महिला मोर्चा च्या जिल्हा अध्यक्ष सौ उज्वला ताई तांभाळे समवेत वसमत तालुका अध्यक्ष सौ निर्मला नादरे,शहर अध्यक्ष सौ शिल्पा ताई महाराज, मुक्तताई बोल्लेवर,वसमत मंडळांचे तालुका अध्यक्ष अवधूत शिंदे,जिल्हा चिटणीस राधाकिशन साबणे,विधानसभा सोशल मीडिया प्रमुख अर्जुन बेंडेप पळशीकर व ग्रामीणच्या महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

Post a Comment

0 Comments