Advertisement

वसमत शहरं. परभणी. मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. विदर्भ. खानदेश. महाराष्ट्र. जळगाव. गोवा... नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹1500

आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सारोळा येथील कुटुंबाचं सात्वन,परिवारास राजूदादा चापके यांची आर्थिक मदत


 आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सारोळा येथील कुटुंबाचं सात्वन,परिवारास राजूदादा चापके यांची आर्थिक मदत

वसमत / खदीर अहेमद

वसमत तालुक्यातील सारोळा येथील सुधाकर रमेश कदम वय २७ वर्ष या युवकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याने या दुःखद प्रसंगी कदम परिवाराच्या सांत्वनासाठी आज शिवसेना नेते तालुका प्रमुख राजुदादा चापके यांनी भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले आणि आपल्यापरीने परिवाराला छोटीशी आर्थिक मदत केली. या दुःखद व कठीण प्रसंगी आपल्यासोबत आहोत असे हि आश्वासित केले.

मराठा समाजातील युवांनी मराठा आरक्षणा संदर्भात धैर्याने निर्णय घ्यावेत. कोणताही लढा लढत असतांना त्यात चढ उतार येत असतात आणि तसेच मराठा आरक्षणा संदर्भातील लढ्यात येत आहेत पण खचून न जाता या परिस्थिला धैर्याने सामोरे जावे लागेल. कोणतेही निर्णय गरबडीत व अहितकारक घेणे हे मराठा आरक्षणासाठी व आपल्या परिवारासाठी हिताचे ठरणार नाहीत. त्यामुळे सर्व युवांनी अशा परिस्थितीत स्वतःला सावरावे अशी भूमिपुत्र राजुदादा चापके यांनी विनंती केली. 

या भेटी प्रसंगी शिवराज यशवंते, योगेश भालेराव, बद्रीनाथ कदम, उत्तमराव दुधाटे, सखाराम पडोळे, ज्ञानेश्वर दुधाटे, उमेश फुलारी, ग्यानोजी दुधाटे, माधव कदम, राजू कदम, आदिनाथ कदम ,ओम नाथ आसेगावकर ,मुंजाजी कदम, अजय कदम, श्रीरंग वाघमारे, प्रभतराव कदम, रामराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments