वसमत / खदीर अहेमद
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा वसमत येथे आली असता पक्षाचे प्रदेशअध्यक्ष तथा मा.मंत्री जयंत पाटील,खासदार अमोल कोल्हे, मा.मंत्री जयप्रकाशजी दांडेगांवकर व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आलेल्या प्रमुख नेत्यांनी स्थानिक आमदारावर हल्लाबोल करत टीकेची तोफ डागली व येणाऱ्या विधानसभेत महाविकस आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहण्याचे सांगितले.
सभे दरम्यान मराठा आंदोलकांनी जयंत पाटील यांना घेराव घालून मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करून जरांगे पाटील यांचे पोस्टर घेऊन घोषणा बाजी केली.
तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतचे माजी सभापती राजेश पाटील इंगोले याचं पक्ष प्रवेश असंख्य कार्यकर्त्यांसह जयंत पाटील यांच्या हस्ते झाला.
त्यावेळी हिंगोली जिल्हा प्रमुख दिलीप चव्हाण,अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष मौलाना मंजूर अहेमद, गटनेते मैनोद्दिन संदलजी, विनोद झंवर,वसंत चेपुरवार,तालुका अध्यक्ष दौलत हुंबाळ,नगरसेवक शेख मोहसीन,शहर अध्यक्ष अय्युब पॉप्युलर,अल्प.शहर अध्यक्ष सरफराज लाला सह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments