हिंगोली लोकसभा क्षेत्रात "नमो चषक" महोत्सवाच्या निमित्ताने भरणार मिनी ऑलंपिक मेळा- रामदास पाटील सुमठाणकर
वसमत / खदीर अहेमद
स्वामी विवेकानंद यांची जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.१२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या
महोत्सवात 18 खेळ आणि संस्कृतिक कला च समावेश करण्यात आल्याची माहिती रामदास पाटील यांनी दिली.
या नमो चषकाचे मुख्य आयोजन ग्रामीण तसेच शहरी भागातील तरूणांना मैदानी खेळाची गोडी निर्माण व्हावी.तसेच प्रतिभावान खेळाडू निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.
स्वामी विवेकानंदांची भाषणे,त्यांची शिकवण तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहेत.आपल्या देशातील प्रतिभावान तरुणांना राष्ट्र उभारणीसाठी प्रेरित करण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा व देशासाठी नवतरुण युवा उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत या हेतूने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन देशभर होत आहे.हा केवळ महोत्सव नसून हिंगोली लोकसभा क्षेत्रात भरणारा मिनी ऑलिम्पिकचा मेळा असणार आहे.
भाजप युवा मोर्चातर्फे सर्व 6 विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद निहाय ''नमो चषक'' क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याने सर्वत्र जनजागृती करून शालेय विद्यार्थ्याना यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे.हा महोत्सव १२ ते २६ जानेवारी या कालावधीत होणार असून,लोकसभा क्षेत्रातील विवध मैदानावर पार पडणार आहे.अशी माहिती भाजपा लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी हिंगोली येथे युवा मोर्चा नियोजन बैठकीत दिली.
यावेळी मा.आ.तान्हाजीराव मुटकुळे साहेब,जिल्हाध्यक्ष फुलाजी मामा शिंदे,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष पप्पू चव्हाण,विधानसभा संयोजक शिवाभाऊ मुटकुळे,युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी शिवा भाऊ घुगे,मंडळ अध्यक्ष माणिक लोढे, कैलास सेठ काबरा,हिम्मत राठोड,पक्षाचे पदाधिकारी,महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे असे म्हणाले,‘‘भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशकडून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हा महोत्सव होणार आहे.हिंगोली लोकसभेतील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये 12 जानेवारीपर्यंत या स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत खेळाडू यात सहभागी होऊ शकतात.लोकसभेतील सर्व विधानसभा क्षेत्रात भाजपा पदाधिकारी यांच्याकडे किंवा ऑनलाईन नावनोंदणी करावी.यामध्ये कुस्ती,फुटबॉल, व्हॉलीबॉल,क्रिकेट,रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, धावणे आदी क्रीडा प्रकार घेण्यात येणार आहेत.यासाठी महिला व पुरुष असे दोन गटअसणार आहेत.’’
पाटील पुढे म्हणाले, ‘‘सांस्कृतिक प्रकारामध्ये चित्रकला, रांगोळी, गीत गायन, नृत्य, एकांकिका, वकृत्व आदी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा खुल्या गटात एकत्रित असणार आहेत. हा महोत्सव साजरा होत असताना जिल्ह्यातील भाजपाचे सर्व नेतेमंडळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन होणार आहे. उद्घाटन व सांगता कार्यक्रमास राज्य पातळीवरील नेतेमंडळींसह युवा मोर्चाचे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत सहभाग नोंदणी नमो ॲपवर ऑनलाईन उपलब्ध आहे.’’ किंवा खालील दिलेल्या संकेत स्थळावर आपला सहभाग नोंदवू शकत.
0 Comments